राज्यातील सामाजिक, राजकीय, गुन्हे विश्वातील, हवामान अपडेट्स आणि इतर घडामोडी वाचा.
राज्यात मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) मुंबई पालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे. तर, उर्वरित शहरात महाविकास आघाडीतून लढणार असल्याची भूमिका संजय राऊतांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी गंभीर आरोप केले आहेत. बाबा सिद्दीकींनी शेवटच्या अर्धा तास आधी भाजपाच्या मोहित कंबोज यांच्याशी संवाद साधला होता, असा गौप्यस्फोट केला. तर, या प्रकरणात त्यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे)पक्षाचे नेते अनिल परब यांचंही नाव घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यानंतर आता कोल्हापूरातही गुलेन बॅरी सिंड्रोमचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. सोलापुरात काल एका संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर पावलं उचलली आहेत.