३० मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

३० मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष-mycivilexam.com
३० मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

३० मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष


१६६५
: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

१९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

१९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.


३० मार्च जन्म दिनविशेष

१८५३: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९०)

१८९४: इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७७)

१८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)

१८९९: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०)

१९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)

१९०८: अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९४)

१९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.

१९४२: भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.

१९७७: भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे यांचा जन्म.

१८२०: तस्मानिया देशाचे ६वे प्रीमियर, स्कॉटिश-ऑस्ट्रेलियन राजकारणी जेम्स व्हाईट याचा जन्म (मृत्यू : २० ऑगस्ट १८८२)


३० मार्च मृत्यू दिनविशेष

१९५२: भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक यांचे निधन.

१९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

१९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

१९८१: रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते डेविट वलास यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९)

१९८९: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)

२००२: गीतकार आनंद बक्षी यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९२०)

२००५: भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९३०)

२०१२: कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचे निधन.

१९८८: फ्रान्स देशाचे १३९वे पंतप्रधान, इतिहासकार आणि राजकारणी एडगर फौर यांचे निधन (जन्म: १८ ऑगस्ट १९०८)

१९८०: व्हिएतनाम देशाचे २रे राष्ट्राध्यक्ष, राजकारणी टन डक थांग यांचे निधन (जन्म: २० ऑगस्ट १८८८)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.