२९ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष
१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.
१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.
१९४२: क्रिप्स योजना जाहीर
१९७४: मरिनर प्रोग्राम – नासाचे मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ठरले
२९ मार्च जन्म दिनविशेष
१८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)
१९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)
१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २०१०)
१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)
१९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.
१९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.
१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.
१९४८: नागनाथ कोतापल्ले – साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
१९३९: भारतीय विनोदी अभिनेते सुरमा भोपाली यांचा जन्म (मृत्यू : ८ जुलै २०२०)
१९१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार, पत्रकार आणि लेखक चापमॅन पिंचर यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट २०१४)
१७९०: अमेरिका देशाचे १०वे राष्ट्राध्यक्ष जॉन टायलर यांचा जन्म (मृत्यू : १८ जानेवारी १८६२)
१००१: बर्मा देशाचे मूर्तिपूजक राजवंशाचा राजा सोक्कते यांचा जन्म (मृत्यू : ११ ऑगस्ट १०४४)
२९ मार्च मृत्यू दिनविशेष
१५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)
१९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.
१९७१: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)
१९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)
१९८२: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचे निधन (जन्म: १७ नोव्हेंबर १९०१)
१९६६: ग्रीस देशाचे १११वे पंतप्रधान, कर्नल आणि राजकारणी स्टायलियनोस गोनाटास यांचे निधन (जन्म: १८ ऑगस्ट १८७६)