आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एका कार अपघातामधून बचावलेल्या एका महिलेने त्यांना आलेला थरारक अनुभव सांगितला आहे.
देशभरात दररोज अनेक अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा अपघाताची घटना घडल्यानंतर लवकर मदत देखील मिळत नाही. तसेच अनेकदा भीषण अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही अपघाताच्या घटनांचे व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एका कार अपघातामधून बचावलेल्या एका महिलेने त्यांना आलेला थरारक अनुभव सांगितला आहे. २० सप्टेंबर २०२४ रोजी अनुपमा सिंग या मुंबईहून पुण्याला परतत होत्या. तेव्हा दुपारी २.४५ च्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोगद्यात त्यांच्या बीएमडब्ल्यू कारला अपघात झाला. त्यांची कार एका ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन धडकली.