क्रिकेटपटू रिंकू सिंह इंग्लंडविरुद्ध टी२० मालिकेत बुधवारपासून खेळताना दिसणार आहे. तत्पूर्वी त्याचा आणि खासदार प्रिया सरोज यांचा विवाह निश्चित झाल्याची माहिती दोघांच्या कुटुंबियांनी दिली.
आयपीएलच्या माध्यमातून प्रसिद्धिस आलेला आणि आता भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिंकू सिंह हा लवकरच लोकसभेच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. मूळचा अलीगढचा असलेला रिंकू सिंहने (२७) भारतासाठी दोन एक दिवसीय आणि ३० टी-२० सामने खेळले आहेत. तर समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (२६) या पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. दोघांच्या कुटुंबियांनी लग्न होणार असल्याबाबत दुजोरा दिला आहे.