नवी मुंबईत झालेल्या ‘कोल्डप्ले’ कॉन्सर्टसाठी गोरेगावहून नेरूळपर्यंत विशेष लोकल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
भारत व इंग्लंड यांच्यादरम्यान सध्या टी-२० क्रिकेट सामन्यांची मालिका चालू आहे. या मालिकेतील एक सामना पुण्याजवळीस गहुंजे क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यासाठी गहुंजे स्टेडियमवर सर्व व्यवस्था चोख ठेवण्यावर MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं लक्ष केंद्रीत केलं आहे. पण प्रत्यक्ष स्टेडियमवर क्रिकेट चाहत्यांना सुविधा उपलब्ध होणार असल्या, तरी स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तिथे पोहोचल्यावरही होणारा मनस्ताप मात्र पुणेकरांसाठी अटळ असल्याचं आता दिसत आहे. स्टेडियमपर्यंत जाणाऱ्या अरुंद रस्त्यांमुळे ही अडचण उद्भवल्याचं एमसीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.