गेल्या निवडणुकीत जेमतेम दहा नगरसेवकपर्यंत मजल मारणाऱ्या एकसंध शिवसेनेपैकी शिवसेना (शिंदे) पक्षाकडे अवघा एक नगरसेवक. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे राहिलेल्या नऊपैकी एकाने काँग्रेस गाठली आणि आता पाचजणांनी भाजपचा आसरा घेतला.
आव्वाज कुणाचा? अशी आरोळी दिली जाताच आसमंतात घुमणारा शिवसेनेचा पुण्यातील आवाज आता क्षीण झाला आहे. क्षीण म्हणजे एवढा की शेवटची घटका मोजत असल्यासारखा. मग ती शिवसेना (ठाकरे) असो की शिवसेना (शिंदे). दुभंगलेल्या या दोन्ही शिवसेनेची पुण्यातील ताकद किती? गेल्या निवडणुकीत जेमतेम दहा नगरसेवकपर्यंत मजल मारणाऱ्या एकसंध शिवसेनेपैकी शिवसेना (शिंदे) पक्षाकडे अवघा एक नगरसेवक. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे राहिलेल्या नऊपैकी एकाने काँग्रेस गाठली आणि आता पाचजणांनी भाजपचा आसरा घेतला. त्यामुळे तीन नगरसेवक राहिलेल्या या पक्षाचे ‘तीन’तेरा वाजले आहेत.