कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम याचे वार्षिक वेतन समोर आले आहे.
लार्सन अँड टुब्रोच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांनी रविवारसह आठवड्यातून ९० तास काम करावे असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. त्यांच्या या सल्ल्यावर उद्योगती हर्ष गोयंक, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बॅटमिंटन ज्वाला गुट्टानेही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करण्याचा सल्ला देणारे लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांचे वार्षिक वेतन समोर आले आहे. २०२३-२४ या वर्षात त्यांना एकूण ५१ कोटी रुपये वेतन म्हणून मिळाले आहेत. जे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा ५०० पट अधिक आहेत.
एसएन सुब्रह्मण्यम यांना २०२३-२४ मध्ये ५१ कोटी रुपये वेतन.
अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील कंपनी असलेल्या लार्सन अँड टुब्रोच्या आर्थिक वर्ष २०२४ च्या वार्षिक अहवालानुसार, कंपनीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना गेल्या आर्थिक वर्षात एकूण ५१ कोटी रुपये वेतन मिळाले आहे. हे वेतन मागील वर्षाच्या तुलनेत ४३.११ टक्के जास्त आहे. याबाबत इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.