आज अनेक ठिकाणी मनुस्मृतीचा उल्लेख सातत्याने होताना दिसतो आणि त्याचा थेट संबंध जातिव्यवस्थेशी जोडला जातो. मनुस्मृती हा प्रकार नेमका काय आहे? आणि त्यापूर्वीच्या धर्मशास्त्रांपेक्षा मनुस्मृती वेगळी कशी आहे हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
UPSC- स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. आजच्या विशेष लेखामध्ये पुराणशास्त्र आणि संस्कृती या विषयामधील तज्ज्ञ देवदत्त पट्टनायक मनुस्मृती आणि जातिव्यवस्थेबद्दल त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट करत आहेत. आज प्रत्येकजण मनुस्मृतीविषयी बोलताना आणि त्याचा संबंध जातिव्यवस्थेशी जोडताना आपण पाहतो. परंतु मनुस्मृती नेमकी काय आहे? हे समजून घेण्यासाठी भारतीय इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.