राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. या हत्येतील सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. दुसरीकडे खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सध्या कोठडीत असून वाल्मिक कराडचा या घटनेत संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच वाल्मिक कराड कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? हे अद्याप समोर आलेलं नाही. तसेच सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण सुरु आहे. याबरोबरच एचएमपीव्ही विषाणूचे काही रुग्ण भारतातही सापडले आहेत. त्यामुळे याबाबत आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे.