२० जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

२० जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.-mycivilexam.com
२० जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

२० जानेवारी महत्वाच्या घटना.

१७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
१८४१: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
१९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
१९४४: दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.
१९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्‍न झाला.
१९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
१९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
१९६९: क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.
१९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.
१९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.


२० जानेवारी जन्म-दिनविशेष.

१७७५: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे-मरी अॅम्पियर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १८३६)

१८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.

१८७१: टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)

१८८९: महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.

१८९८: नात मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९७४)

१९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.

१९६०: १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा जन्म.

१९७२: भारतीय चित्रपट अभिनेते – भूपेश पांड्या (मृत्यू : २३ सप्टेंबर २०२०)

१९४९: भारतीय चित्रपट अभिनेते – अजित दास (मृत्यू : १३ सप्टेंबर २०२०)

१९४०: भारतीय अभिनेते आणि खासदार – कृष्णम राजू (मृत्यू : ११ सप्टेंबर २०२२)

१९४०: माली देशाचे पंतप्रधान, मालियन अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी – मांडे सिदिबे (मृत्यू : २५ ऑगस्ट २००९)

१९२६: रशिया देशाचे २७वे पंतप्रधान – विटाली व्होरोत्निकोव्ह (मृत्यू : १९ फेब्रुवारी २०१२)


२० जानेवारी मृत्यू-दिनविशेष.

१८९१: हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)

१९३६: युनायटेड किंगडमचा राजा जॉर्ज पाचवा यांचे निधन. (जन्म: ३ जून १८६५)

१९५१: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)

१९८०: दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)

१९८८: स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)

१९९३: अँग्लो-डच अभिनेत्री आँड्रे हेपबर्न यांचे निधन. (जन्म: ४ मे १९२९)

२००२: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचे निधन. (जन्म: १० मे १९१८)

२००५: नॉर्वे देशाचे १८वे पंतप्रधान – पेर बोरटें (जन्म: ३ एप्रिल १९१३)

१९०१: बेल्जियन अभियंते, ग्राम यंत्राचे संशोधक – झेनोब ग्राम (जन्म: ४ एप्रिल १८२६)

१७४५: पवित्र रोमन सम्राट – चार्ल्स सातवा (जन्म: ६ ऑगस्ट १६९७)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.