राज्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्येप्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले असून त्यांचे कथित साथीदार वाल्मिक कराड यांची सीआयडी चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन आठवडे उलटले तरी पालकमंत्री ठरलेले नाहीत. तिन्ही पक्षांतील अंतर्गत रस्सीखेचमुळे पालकंत्रीपदावर शिक्कामोर्तब होत नसल्याचं समजते आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.