अनुप कुमार बंगळुरूत एका खासगी कंपनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कामानिमित्त ते उत्तर प्रेदशातून बंगळुरू येथे स्थायिक झाले. सोमवारी सकाळी त्यांच्या घरात काम करणारी मदतनीस घरी आली. तिने बराचवेळ दार ठोठावूनही तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
बंगळुरूतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बंगळुरूच्या आरएमव्ही सेकंड स्टेज भागात भाड्याने राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनअरच्या घरात चार जणांचे मृतदेह आढळळे आहेत. अनुप कुमार (३८), पत्नी राखी (३५), त्यांची पाच वर्षांची मुलगी अनुप्रिया आणि २ वर्षांचा मुलगा प्रियांश अशी मृतांची नावे आहेत. यांनी सामूहिक आत्महत्या केली की हा घातपाचा प्रयत्न आहे याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.