उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार. (संग्रहित छायाचित्र).
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत आहे. तर या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही अद्याप फरार आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केले असून या पथकाच्या चौकशीत काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील जुने सहकारी शरद पवार आणि छगन भुजबळ हे आज पुण्यातील चाकण येथे एकत्र येणार आहेत. येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी हे नेते एका मंचावर येणार आहेत. यादरम्यान महायुतीमध्ये मंत्रिपद न मिळल्याने नाराज असलेल्या भुजबळांची शरद पवारांबरोबर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.