३ फेब्रुवारी महत्वाच्या घटना
१७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
१८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
१९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
१९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला
१९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
१९८६: पिक्सार ऍनिमेशन स्टुडिओ – सुरवात.
३ फेब्रुवारी जन्म-दिनविशेष
१८२१: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९१०)
१८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३)
१८८७: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.
१९००: रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)
१९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.
३ फेब्रुवारी मृत्यू-दिनविशेष
१४६८: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.
१८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)
१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८५६)
१९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)
२०२३: भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट, बरेलीचे बिशप – अँथनी फर्नांडिस (जन्म: ६ जुलै १९३६)
२०२३: भारतीय अभिनेते – वान्नरपेट्टाई थांगराज
२०२२: ग्रीस देशाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायमूर्ती – क्रिस्टोस सार्टझेटाकीस (जन्म: ६ एप्रिल १९२९)
१९६४: श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी – सी. सित्तमपालम (जन्म: १३ सप्टेंबर १८९८)
१९५१: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक – चौधरी रहमत अली (जन्म: १६ नोव्हेंबर १८९७)
१९५१: जर्मन उद्योजक, ऑडी मोटार कंपनीचे संस्थापक – ऑगस्ट हॉच (जन्म: १२ ऑक्टोबर १८६८)
१०९४: जपान देशाची सम्राज्ञी – तेईशी (जन्म: १५ ऑगस्ट १०१३)