२० जानेवारी महत्वाच्या घटना.
१७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
१८४१: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
१९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
१९४४: दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.
१९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला.
१९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
१९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
१९६९: क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.
१९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.
१९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
२० जानेवारी जन्म-दिनविशेष.
१७७५: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे-मरी अॅम्पियर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १८३६)
१८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.
१८७१: टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
१८८९: महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.
१८९८: नात मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९७४)
१९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.
१९६०: १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा जन्म.
१९७२: भारतीय चित्रपट अभिनेते – भूपेश पांड्या (मृत्यू : २३ सप्टेंबर २०२०)
१९४९: भारतीय चित्रपट अभिनेते – अजित दास (मृत्यू : १३ सप्टेंबर २०२०)
१९४०: भारतीय अभिनेते आणि खासदार – कृष्णम राजू (मृत्यू : ११ सप्टेंबर २०२२)
१९४०: माली देशाचे पंतप्रधान, मालियन अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी – मांडे सिदिबे (मृत्यू : २५ ऑगस्ट २००९)
१९२६: रशिया देशाचे २७वे पंतप्रधान – विटाली व्होरोत्निकोव्ह (मृत्यू : १९ फेब्रुवारी २०१२)
२० जानेवारी मृत्यू-दिनविशेष.
१८९१: हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
१९३६: युनायटेड किंगडमचा राजा जॉर्ज पाचवा यांचे निधन. (जन्म: ३ जून १८६५)
१९५१: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
१९८०: दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
१९८८: स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)
१९९३: अँग्लो-डच अभिनेत्री आँड्रे हेपबर्न यांचे निधन. (जन्म: ४ मे १९२९)
२००२: रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचे निधन. (जन्म: १० मे १९१८)
२००५: नॉर्वे देशाचे १८वे पंतप्रधान – पेर बोरटें (जन्म: ३ एप्रिल १९१३)
१९०१: बेल्जियन अभियंते, ग्राम यंत्राचे संशोधक – झेनोब ग्राम (जन्म: ४ एप्रिल १८२६)
१७४५: पवित्र रोमन सम्राट – चार्ल्स सातवा (जन्म: ६ ऑगस्ट १६९७)