२ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष 

२ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-mycivilexam.com

२ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

१९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

१९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.

१५५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

१९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.

१९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला

१९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.


२ फेब्रुवारी जन्म-दिनविशेष 

१७५४: फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८३८)

१८५६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)

१८८४: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)

१८९७: हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १९७२)

१९०५: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

१९२२: भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७८)

१९२३: केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)

१९७९: अभिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.

१९५८: भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक – तुलसी तंती (मृत्यू : १ ऑक्टोबर २०२२)

१९२५: आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक – जीत सिंग नेगी (मृत्यू : २१ जून २०२०)cc

१९१९: भारतीय लेखक आणि अनुवादक – एम. सी. नंबुदरीपद (मृत्यू : २६ नोव्हेंबर २०१२)

१९१५: भारतीय पत्रकार आणि लेखक – खुशवंत सिंग (मृत्यू : २० मार्च २०१४)

१८९२: जपानी सुमो कुस्तीपटू, २७वे योकोझुना – टोचीगीयामा मोरिया (मृत्यू : ३ ऑक्टोबर १९५९)


२ फेब्रुवारी मृत्यू-दिनविशेष

१९०७: रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)

१९१७: लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)

१९३०: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १८७१)

१९७०: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन. (जन्म: १८ मे १८७२)

१९८७: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन. (जन्म: २१ एप्रिल १९२२)

२००७: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन. (जन्म: २७ डिसेंबर १९४४)

२०२३: भारतीय चित्रपट दिग्दर्शक – सागर

२०२३: भारतीय चित्रपट दिग्दर्शक – पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार – के. विश्वनाथ (जन्म: १९ फेब्रुवारी १९३०)

२००८: अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक – जोशुआ लेडरबर्ग (जन्म: २३ मे १९२५)

१९४१: भारतीय इतिहासकार आणि लेखक – रामचंद्र शुक्ला (जन्म: ४ ऑक्टोबर १८८४)

१९३९: रशियन वास्तुविशारद आणि अभियंते, Adziogol Lighthouse चे रचनाकार – व्लादिमीर शुखोव्ह (जन्म: २८ ऑगस्ट १८५३) 




नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.