१५ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

१५ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष-mycivilexam.com
१५ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

१५ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

१४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.

१५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.

१६८०: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.

१८२०: मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.

१८२७: टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.

१८३१: मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.

१८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

१८९२: लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.

१९०६: रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.

१९१९: हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.

१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.

१९५६: ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडी चा पहिला प्रयोग झाला.

१९६१: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

१९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.

१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

२००१: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.

२०११: सीरियन युद्ध सुरु झाले.

१९५०: नियोजन आयोगाची स्थापना


१५ मार्च जन्म दिनविशेष


१७६७
: अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८४५)

१८६०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)

१८६६: पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९१०)

१९०१: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९९)

१९७७: भारतीय सैनिक – संदीप उन्नीकृष्णन (मृत्यू : २८ नोव्हेंबर २००८)

१९५३: गिनी-बिसाऊ देशाचे अध्यक्ष बिसाऊ-गिनी सैनिक आणि राजकारणी – कुंबा इला (मृत्यू : ४ एप्रिल २०१४)

१९४३: दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री – साहिबसिंह वर्मा (मृत्यू : ३० जून २००७)

१९३४: भारतीय वकील आणि राजकारणी – कांशी राम (मृत्यू : ९ ऑक्टोबर २००६)

१९२९: भारतीय संगीतकार – एस. आर. डी. वैद्यनाथन (मृत्यू : १८ नोव्हेंबर २०१३)

१८६५: पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर – आनंदी गोपाळ जोशी (मृत्यू : २६ फेब्रुवारी १८८७)

१८३०: जर्मन लेखक, कवी आणि अनुवादक – नोबेल पुरस्कार – पॉल हेसे (मृत्यू : २ एप्रिल १९१४)

१८०९: लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष – जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स (मृत्यू : २४ फेब्रुवारी १८७६)


१५ मार्च मृत्यू दिनविशेष

४४: ख्रिस्त पूर्व ४४: रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या केली.

१९३७: रंगभूमीवरील अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९२)

१९९२: हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन.

२०००: विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.

२००२: इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.

२००३: मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.

२०१३: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)

२०१५: भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४)

१९८०: मेजर लीग बेसबॉलमधील पहिले आफ्रिकन अमेरिकन पंच – एम्मेट एशफोर्ड (जन्म: २३ नोव्हेंबर १९१४)

१९३३: पेरू देशाचे ७३वे राष्ट्राध्यक्ष, कर्नल आणि राजकारणी – गुस्तावो जिमेनेझ (जन्म: ५ एप्रिल १८८६)

१७२१: डेन्मार्क आणि नॉर्वे देशाच्या राणी – लुईस ऑफ मेक्लेनबर्ग-गुस्ट्रो (जन्म: २८ ऑगस्ट १६६७)

१६६०: डॉटर्स ऑफ चॅरिटीचे सह-संस्थापक – लुईस डी मारिलॅक (जन्म: १२ ऑगस्ट १५९१)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.