६ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

६ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष./mycivilexam.com
६ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

६ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.

१६७३: कोंडाजी फर्जद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे १३ वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.

१८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले.

१८३८: सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला.

१९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.

१९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले.

१९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता.

१९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.

१९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.


६ जानेवारी जन्म-दिनविशेष.

१७४५: बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कास एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म.

१८१२: मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६)

१८२२: उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेन्रीचा श्लीमन यांचा जन्म.

१८६८: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)

१८८३: लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार खलील जिब्रान यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३१)

१९२७: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९७)

१९२८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)

१९३१: पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट)अध्यक्ष डॉ. आर. डी. देशपांडे यांचा जन्म.

१९५५: विनोदी अभिनेते व पटकथालेखक रोवान अ‍ॅटकिन्सन यांचा जन्म.

१९५९: भारतीय क्रिकेटपटू पद्मश्री कपिलदेव निखंज यांचा जन्म.

१९६६: सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा जन्म.

१९२५: रमेशमंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक (मृत्यू : १९ जून १९९८)

१९२५: जॉन डेलोरेअन – डेलोरेअन मोटर कंपनीचे सहसंस्थापक (मृत्यू : १९ मार्च २००५)


६ जानेवारी मृत्यू-दिनविशेष.

१७९६: महादजी शिंदे यांचे सेनापती जिवबा दादा बक्षी यांचे निधन.

१८४७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचे निधन. (जन्म: ४ मे १७६७)

१८५२: अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक लुई ब्रेल यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १८०९)

१८८४: जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८२२)

१८८५: आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरीश्चंद यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)

१९१८: जर्मन गणितज्ञ जी. कँटर यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८४५)

१९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १८५८)

१९७१: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)

१९८१: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १८९६)

१९८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८८४)

२०१०: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९४३)

१९६८: कार्ल कोबेल्ट – स्विस कॉन्फेडरेशनचे ५२वे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म: १ ऑगस्ट १८९१)

१९३९: गुस्ताव झेमगल्स – लॅटव्हिय देशाचे २रे अध्यक्ष, राजकारणी (जन्म: १२ ऑगस्ट १८७१)

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

स्रोत:

www.mycivilexam.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.