२३ फेब्रुवारी महत्वाच्या घटना(23 February Dinvishesh)
१४५५: पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले.
१७३९: चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.
१९४१: डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.
१९४५: दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई – अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.
१९४५: दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.
१९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना.
१९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
१९६६: सीरियात लष्करी उठाव झाला.
१९९६: कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.
१९९७: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.
२०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
२०१२: इराक – देशात झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेत किमान ८३ लोकांचे निधन तर २५० हून अधिक जखमी झाले.
१९५४: पोलिओ – अमेरिकेतील पिट्सबर्गमध्ये साल्क लसीने पोलिओविरूद्ध मुलांचे पहिले सामूहिक लसीकरण सुरू झाले.
१९०५: रोटरी इंटरनॅशनल – अमेरिकन वकील पॉल हॅरिस आणि इतर तीन व्यावसायिक दुपारच्या जेवणासाठी भेटले तेव्हा रोटरी क्लब, जगातील पहिला सेवा क्लब स्थापन झाला.
१९०५: रोटरी इंटरनॅशनल – स्थापना.
१९०३: ग्वांटानामो बे – क्युबा देशाने ‘ग्वांटानामो बे’ प्रदेश अमेरिकेला शाश्वत भाड्याने दिला.
१८८७: फ्रांस – देशातील फ्रेंच रिव्हिएरा प्रांतात मोठा भूकंप, या दुर्घटनेत किमान २००० लोकांचे निधन
२३ फेब्रुवारी जन्म दिनविशेष(23 February Dinvishesh)
१६३३: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १७०३)
१८५०: रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिस चे निर्माते सीझर रिट्झ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९१४ )
१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)
१९१३: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९७१)
१९५७: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)
१९६५: झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हेलेना सुकोव्हा यांचा जन्म.
१९६५: मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर अशोक कामटे यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर २००८)
१९६९: अमेरिकन फॅशन डिझायनर, FUBU कंपनीचे संस्थापक – डेमंड जॉन
१९५४: युक्रेन देशाचे ३रे राष्ट्राध्यक्ष – व्हिक्टर युश्चेन्को
१९४९: मार्क गार्न्यु – पहिले कॅनेडियन अंतराळवीर, राजकारणी
१९२४: दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक – ऍलन मॅक्लिओड कॉर्मॅक (मृत्यू : ७ मे १९९८)
१९२३: ग्रीस देशाचे १७६वे पंतप्रधान – इओनिस ग्रीवास (मृत्यू : २७ नोव्हेंबर २०१६)
१९२३: उरुग्वे देशाचे अध्यक्ष – राफेल एडिएगो ब्रुनो (मृत्यू : २० फेब्रुवारी २०१४)
१९०८: ऑस्ट्रेलिया देशाचे २०वे पंतप्रधान – विल्यम मॅकमोहन (मृत्यू : ३१ मार्च १९८८)
१८७४: एस्टोनिया देशाचे पहिले अध्यक्ष – कॉन्स्टँटिन पॅट्स (मृत्यू : १८ जानेवारी १९५६)
१८५२: व्हिएतनामी सम्राट – डक डक (मृत्यू : ६ ऑक्टोबर १८८३)
१४४३: हंगेरी आणि क्रोएशियाचे राजा – मॅथियास कॉर्विनस (मृत्यू : ६ एप्रिल १४९०)
२३ फेब्रुवारी मृत्यू दिनविशेष (23 February Dinvishesh)
१७७७: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १७७७)
१७९२: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १७२३ – प्लिम्प्टन, प्लायमाऊथ, इंग्लंड)
१९०४: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक महेन्द्र लाल सरकार यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८३३ – पैकपारा, हावडा, पश्चिम बंगाल)
१९४४: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८६३ – घेन्ट, बेल्जिअम)
१९६९: चित्रपट अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९३३ – नवी दिल्ली)
१९९८: क्रिकेटपटू रमण लांबा यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९६०)
२०००: वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन.
२००४: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१८)
२००४: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९३४)

२०११: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२३)
२०१३: भारतीय वकील आणि शैक्षणिक – लोटिका सरकार (जन्म: ४ जानेवारी १९२३)
२००९: नॉर्वेजियन वास्तुविशारद, हेडमार्क संग्रहालयाचे रचनाकार – स्वेररे फेहन (जन्म: १४ ऑगस्ट १९२४)
२००८: स्लोव्हेनिया देशाचे २रे अध्यक्ष – जेनेझ ड्रनोव्हसेक (जन्म: १७ मे १९५०)
२००६: कॅनेडियन प्रसारक, मचमुसिक कंपनीचे सहसंस्थापक – जॉन मार्टिन
१९९०: एल साल्वाडोर देशाचे अध्यक्ष – जोस नेपोलियन दुआर्टे (जन्म: २३ नोव्हेंबर १९२५)
१९७३: अमेरिकन डॉक्टर आणि फिजिओलॉजिस्ट – नोबेल पारितोषिक – डिकिन्सन डब्ल्यू. रिचर्ड्स (जन्म: ३० ऑक्टोबर १८९५)
१९६९: सौदी अरेबिया देशाचे २रे राजा – सौद बिन अब्दुलाझीझ अल सौद (जन्म: १५ जानेवारी १९०२)
१९३३: इंग्लिश चित्रपट प्रणेते, युनिव्हर्सल स्टुडिओचे सहसंस्थापक – डेव्हिड होर्सले (जन्म: ११ मार्च १८७३)
१८७९: प्रुशिया देशाचे १०वे मंत्री-राष्ट्राध्यक्ष – अल्ब्रेक्ट वॉन रून (जन्म: ३० एप्रिल १८०३)
१८४८: अमेरिका देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष – जॉन क्विन्सी ऍडम्स (जन्म: ११ जुलै १७६७)
१७८१: युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे संस्थापक – जॉर्ज टेलर
२२ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष