गेल्या दोन दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडची असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजधानीत दाखल झाले आहेत. मात्र, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा चालू असताना फडणवीस व अजित पवार दिल्लीत असल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.