गुजरातच्या वलसाड येथे २२ वर्षीय प्रेयसीबरोबर राहणाऱ्या अल्पवयीन प्रियकराने प्रेयसीच्या चार महिन्याच्या बाळाची हत्या केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये पळ काढला.
(गुजरातच्या वलसाड येथे अल्पवयीन प्रियकराने प्रेयसीच्या बाळाचा खून केला.)
गुजरातच्या वलसाड येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एक २२ वर्षीय तरुणी तिचा चार महिन्यांचा मुलगा आणि अल्पवयीन प्रियकराबरोबर राहत होती. मात्र अल्पवयीन प्रियकराने तान्ह्या मुलाचा खून करून उत्तर प्रदेशला पळ काढला. शनिवारी वलसाड पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलसाडच्या उमरगाव येथे सदर अल्पवयीन मुलगा त्याच्या प्रेयसीबरोबर राहत होता. चार महिन्यांचा खून केल्यानंतर त्याने प्रयागराजला पळ काढला होता.