विजय शिवतारे : मंत्रिपद मिळालं नाही त्यापेक्षा मिळालेली वागणूक वाईट आहे. मंत्रिपद न मिळाल्याने शिवतारे यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या पक्षावर तोफ डागली आहे.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे बरेच नेते नाराज झाले आहेत. छगन भुजबळ, अब्दुल सत्तार आणि आता पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे तथा शिवसेनेचे आमदार (शिंदे गट) विजय शिवतारे देखील नाराज असल्याचं त्यांनी उघडपणे सांगितलं आहे.
मंत्रिपद मिळालं नाही त्यापेक्षा मिळालेली वागणूक वाईट आहे. मंत्रिपद न मिळाल्याने शिवतारे यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या पक्षावर तोफ डागली आहे. ”आम्ही काही गुलाम नाही आहोत. अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही. तीनही नेते साधे भेटायला देखील तयार नाहीत. मला गरज नाही, माझ्या मतदारसंघातील काम मुख्यमंत्र्यांकडून करुन घेईल. मंत्रिपद मिळालं नाही त्याचा राग नसून वागणूकीचा राग आला आहे”, असं वक्तव्य विजय शिवतारे यांनी केलेलं आहे.
दरम्यान, ”जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाहीय. पण मी नाराज आहे. ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला यश मिळालं”, असं म्हणत छगन भुजबळांनी देखील आपली नाराजी स्पष्ट जाहीर केली आहे.