शिर्डीतल्या मेळाव्यात शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण महाराष्ट्राने संपवलं असं अमित शाह यांनी म्हटलं होतं. त्या टीकेला आज शरद पवरांनी उत्तर दिलं आहे.
शिर्डीतल्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्राने संपवलं असं म्हणत जोरदार टीका केली होती. तसंच १९७८ पासून शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेने २० फूट गाडलं अशी टीका केली होती. आज या सगळ्या टीकेचा शरद पवार यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला.