पुष्पक एक्स्प्रेस बुधवारी दुपारी जळगावहून निघाल्यानंतर पाचोरा परिसरातील परधाडे स्थानकालगत चालकाने अकस्मात ब्रेक दाबला. घर्षण होऊन चाकातून ठिणग्या उडाल्या.
मनमाड – पुष्पक एक्स्प्रेस बुधवारी दुपारी जळगावहून निघाल्यानंतर पाचोरा परिसरातील परधाडे स्थानकालगत चालकाने अकस्मात ब्रेक दाबला. घर्षण होऊन चाकातून ठिणग्या उडाल्या. एका प्रवाशाने घाबरून आग लागल्याचा आरडाओरडा केला. त्यामुळे इतर प्रवाशांनी डब्यातून उड्या मारल्या. त्याचवेळी विरूध्द दिशेने कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. तिच्याखाली अनेक जण सापडले. कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने हॉर्न वाजविला असता तर प्रवासी सावध झाले असते…