महाराष्ट्र विधानसभा निवडणूक व सरकार स्थापनेबाबत झालेल्या घडामोडी या लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचा स्रोत ठरणाऱ्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व सरकार स्थापनेबाबत झालेल्या घडामोडी या लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचा स्रोत ठरणाऱ्या आहेत. या घडामोडींमधील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटनाक्रम आणि त्याच्याशी संबंधित अभ्यासावयाचे मुद्दे लक्षात यावेत यासाठी या व पुढील काही लेखांमध्ये याच मुद्द्यावर आधारित सराव प्रश्न देण्यात येत आहेत.
निवडणूक याबाबतचा महत्त्वाचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे:
० ऑक्टोबर २०२४ – एका टप्प्यात निवडणूक संपन्न
२३ ऑक्टोबर २०२४ – निकाल जाहीर. जागा- भाजप १३२, शिवसेना ५७, राष्ट्रवादी काँग्रेस ४१, शिवसेना (उबाठा) पक्ष २०, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष १० व इतर १०
२६ नोव्हेंबर २०२४ – १४ व्या विधानसभेची मुदत संपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा; काळजीवाहू मुखमंत्री म्हणून कार्यरत.
५ डिसेंबर २०२४ – भाजपच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी