राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच आज खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तसेच वाल्मिक कराड याचं एक सीसीटीव्ही फूटेज नुकतंच समोर आलं असून वाल्मिक कराडसोबत इतर आरोपी दिसत आहेत. त्यामुळे हा मुद्दाही चर्चेत आला आहे. तसेच दुसरीकडे सैफ अली खानवरील हल्ला आणि त्याचा हल्लेखोर यासंदर्भात मोठी चर्चा सध्या सुरु आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केलंलं आहे. दरम्यान, या बरोबरच २२ जानेवारी रोजी जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरही आता प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ २२ जानेवारी रोजी मोठा रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, आता भारतीय रेल्वेने या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.