२४ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

२४ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.-mycivilexam.com
२४ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष.

२४ जानेवारी महत्वाच्या घटना.

१८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले.

१८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

१८६२: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.

१९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

१९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.

१९४२: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.

१९४३: पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.

१९६६: भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.

१९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.

१९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.

१९७६: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.

१९८४: अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.

१९५०: भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली.


२४ जानेवारी जन्म-दिनविशेष.

१९२४: तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००० – मुंबई)

१९२४: मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१)

१९४३: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक सुभाष घई यांचा जन्म.

१९५३: दक्षिण कोरिया देशाचे १९वे राष्ट्राध्यक्ष – मून जे-इन

१९४१: इस्रायली रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार – डॅन शेटमन

१९४०: जर्मनी देशाचे ११वे अध्यक्ष – जोकिम गौक

१९२४: बिहारचे ११वे मुख्यमंत्री – कापुरी ठाकूर (मृत्यू : १७ फेब्रुवारी १९८८)

१९२४: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री – हंसा वाडकर (मृत्यू : २३ ऑगस्ट १९७१)

१९१६: व्हेनेझुएला देशाचे ६५वे राष्ट्राध्यक्ष – राफेल कॅल्डेरा (मृत्यू : २४ डिसेंबर २००९)

१९०७: फ्रान्स देशाचे पंतप्रधान – मॉरिस कुवे डी मुरविले (मृत्यू : २४ डिसेंबर १९९९)

१७१२: प्रशिया देशाचे राजा – फ्रेडरिक द ग्रेट (मृत्यू : १७ ऑगस्ट १७८६)

७६: रोमन सम्राट – हॅड्रियन (मृत्यू : १० जुलै ०१३८)


२४ जानेवारी मृत्यू-दिनविशेष.

१९६५: दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)

१९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९)

२००५: गोवा मुक्तिसंग्राम अनुताई लिमये यांचे निधन.

२०११: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)

२००८: बर्मीमध्ये जन्मलेल्या भारताच्या पहिल्या महिला – उषा नारायणन

१९८२: बोलिव्हिया देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष – अल्फ्रेडो ओवांडो कॅंडिया (जन्म: ६ एप्रिल १९१८)

१९७१: अल्कोहोलिक्स एनोनिमसचे सह-संस्थापक, अमेरिकन कार्यकर्ते – बिल डब्ल्यू. (जन्म: २६ नोव्हेंबर १८९५)

१९३९: स्विस चिकित्सक, मुस्लीचे निर्माते – मॅक्सिमिलियन बिर्चर-बेंनेर (जन्म: २२ ऑगस्ट १८६७)

१९१९: अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान – इस्माईल क्यूम्ली (जन्म: १६ ऑक्टोबर १८४४)

१८७२: रग्बी फुटबॉलचे निर्माते – विल्यम वेबल एलिस (जन्म: २४ नोव्हेंबर १८०६)

४१: रोमन सम्राट – कॅलिगुला (जन्म: ३१ ऑगस्ट ००१२ इ.स.पू.)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.