नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट किंवा ई-नाम हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाइन खरेदी – विक्री मंच आहे. हा मंच शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतो. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनांच्या फायदेशीर विपणनासाठी सुद्धा हा मंच उपयुक्त ठरतो आहे.
शेतकऱ्यांव्यतिरिक्त, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, शेतकरी उत्पादक संस्था आणि मंडया या मंचाचे भाग आहेत. नोंदणीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे वाचून घ्या आणि या मंचावर नाव नोंदणी करा. या मंचावर व्यवहार करण्यात आलेल्या उत्पादनांची यादीही तुम्हाला पाहता येईल.