२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
अमेरिका, चीन, भारताविषयी विचारवंत रुचिर शर्मा मांडत आहेत दहा ठळक भाकिते.
जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ आणि लेखक रुचिर शर्मा यांच्याकडून वर्षाच्या सुरुवातीस व्यक्त केली जाणारी जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी भाकिते बहुप्रतीक्षित आणि रंजक असतात. ज्येष्ठ दूरचित्रवाणी पत्रकार, अभ्यासक प्रणय रॉय यांनी डिकोडर मंच आणि इंडियन एक्स्प्रेससाठी रुचिर शर्मा यांची सविस्तर मुलाखत घेतली. रुचिर शर्मा यांनी मांडलेल्या दहा कल किंवा भाकितांचा हा संपादित अंश.