देवेंद्र फडणवीस यांनी एक भाषण चंद्रपूरच्या कार्यक्रमात केलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची आज १२५ वी जयंती आहे. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खुमासदार भाषणही केलं. या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावल्याची चर्चा आहे.