महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केली. तर आमदार मनिषा कायंदे यांनी प्रलंबित निकालावर प्रकाश टाकला. विशेष उल्लेखाद्वारे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
काय म्हणाले अनिल परब..
ज्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी समाज कल्याण सहायक आयुक्त व तत्सम, गट-अ व सहायक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट- अ पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, याच दिवशी इतरही सरकारी विभागांच्या परीक्षा आहेत. अशा पस्थितीत उमेदवार नेमकी कुठली परीक्षा द्यावी, या संभ्रमात आहेत. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी परब यांनी केली.
काय म्हणाल्या मनीषा कायंदे..
मनीषा कायंदे यांनी एमपीएससीतील प्रलंबित निकालाचा मुद्दा उपस्थित केला. एमपीएससीच्या अनेक परीक्षांचे दोन वर्षांपासून निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष आहे. पोळीस, आरोग्यसेवक आदी पदांसाठी भरती झालेली नाही. काही विभागांमध्ये शिफारस नसल्यामुळे नियुक्तीपत्र प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.