राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपक लावण्यात आल्याचा तपशील सरकारी यंत्रणांनीच माहिती अधिकारांत याचिकाकर्त्यांना उपलब्ध केला होता.
धार्मिकस्थळांवरील २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची गृह विभागासह पोलीस महासंचालकांना विचारणा.
मुंबई : राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपक लावण्यात आल्याचा तपशील सरकारी यंत्रणांनीच माहिती अधिकारांत याचिकाकर्त्यांना उपलब्ध केला होता. त्यामुळे, या बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह पोलीस महासंचालकांना केली. तसेच, कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.