विराट कोहलीची वेळ संपली आहे, असे मत इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, कोहली इंग्लंड दौऱ्यावर आला तर गोलंदाज त्याला ऑफ स्टंपबाहेर चेंडू टाकून त्रास देतील.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच कालावधीपासून फॉर्ममशी संघर्ष करताना दिसताना. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान, कोहली सतत ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंना छेडत होता आणि वारंवार विकेट गमावत होता. सध्याच्या महान फलंदाजाची ही कमजोरी पाहून माजी क्रिकेटपटूंनी कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशात डेव्हिड लॉईडने मोठं वक्तव्य केलं आहे.