१३ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष 

१३ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष -मycivilexam.com
१३ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष 

१३ जानेवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष 

१६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

१८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

१९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

१९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

१९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.

१९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.

१९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.

१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

१९९६: पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली.

२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.


१३ जानेवारी जन्म-दिनविशेष 

१९१९: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)

१९२६: हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००९)

१९३८: प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.(मृत्यू : १० मे २०२२)

१९४८: जोधपूरचे राजा गज सिंघ यांचा जन्म.

१९४९: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.

१९८२: पाकिस्तानी क्रिकेटपटू कमरान अकमल यांचा जन्म.

१९८३: भारतीय चित्रपट अभिनेता इम्रान खान यांचा जन्म.

१९१९: जॅकी रॉबिन्सन – अमेरिकन बेसबॉल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन (मृत्यू : २४ ऑक्टोबर १९७२)


१३ जानेवारी मृत्यू-दिनविशेष 

१८३२: लॉर्डस या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)

१९७६: सुप्रसिद्ध तबलावादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.

१९८५: हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन.

१९९७: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

१९९८: संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक शंभू सेन यांचे निधन.

२००१: संस्कृत पंडित आणि लेखक श्रीधर गणेश दाढे यांचे निधन.

२०११: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १९३१)

२०१३: क्रिकेटपटू रुसी सुरती यांचे निधन. (जन्म: २५ मे १९३६)

२०१८: कॅनेडियन पुजारी, डॅन्स ला रुएचे संस्थापक – एमेट जॉन्स (जन्म: ३ एप्रिल १९२८)

१९९३: फ्रान्स देशाचे पंतप्रधान – रेने प्लेव्हन (जन्म: १५ एप्रिल १९०१)

१९५८: अमेरिकन चित्रपट निर्माता, प्रसिद्ध खेळाडूलास्कीचे सहसंस्थापक – जेसी एल लास्की (जन्म: १३ सप्टेंबर १८८०)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.