फरार असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तौसिफ रियाझ हा अल्पशिक्षित होता. त्याने दहावीची परीक्षाही दिली नव्हती. भायखळा येथील आधार केंद्रावर तो ऑपरेटर म्हणून काम करायचा तर, विरार येथे राहणारा होता.
कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या टोरेस स्कॅम हा दोन युक्रेनिअन नागरिकांनी आणला होता. हा स्कॅम उघड होण्याच्या आठवड्यापूर्वीच या दोघांनी देशातून पलायन केले. गुंतवणूक घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, व्हिक्टोरिया कोवालेन्को आणि ओलेना स्टॉईन हे दोन फरार युक्रेनिअन नागरिकांचा या स्कॅममध्ये हात आहे. यामुळे हजारो लहानमोठ्या गुतंवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. हिंदूस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.