आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही एक आरोपी फरार आहे. तसेच वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आला असून तो कोठडीत आहे. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेत वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदवला जात आहे.