निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या पाच तांसांत मतदारांची टक्केवारी कशी वाढली याबाबतही स्पष्टीकरण दिले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केले. ७० आमदार असलेल्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.