मानसिक तणावामुळे एक नवा ट्रेंड सध्या चर्चेत आला आहे. या ट्रेंडचे नाव आहे ‘मायक्रो-रिटायरमेंट’.
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे. ऑफिसमधील कामाच्या तणावामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव वाढत असल्याचे दिसून येते. केवळ चाळिशीनंतरच नव्हे, तर पंचविशीतील तरुण पिढीमध्येदेखील मानसिकरीत्या थकल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. याच मानसिक तणावामुळे एक नवा ट्रेंड सध्या चर्चेत आला आहे. या ट्रेंडचे नाव आहे ‘मायक्रो-रिटायरमेंट’. बूमर्स (१९४६ ते १९६४) व जेन एक्स (१९६५ ते १९८०) प्रत्यक्षात निवृत्त होण्यासाठी धडपडत असताना, तणावात असणारे मिलेनियल्स (१९८१ ते १९९६) व जेन झेड (१९९०-२०१०) कर्मचाऱ्यांना दैनंदिन काम सुरू ठेवणे कठीण जात आहे, त्यामुळे तरुण पिढी या ट्रेंडचा अवलंब करताना दिसत आहे. काय आहे ‘मायक्रो-रिटायरमेंट’ ट्रेंड? या ट्रेंडची इतकी चर्चा का? त्याविषयी जाणून घेऊ.