वडीलांना लेकीने केलेल्या प्रत्येक कामाचे कौतुक असते. सध्या अशाच बाप- लेकीच्या सुंदर नात्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
बाप आणि लेकीचं नातं अत्यंत खास असते. प्रत्येक मुलीचा आपल्या वडीलांवर आणि प्रत्येक वडीलांचे मुलीवर जीवापाड प्रेम असते. लेक जन्मल्यापासून सासरी जाईपर्यंत वडील तिला फुलांसारखे जपतात. वडीलांनी केलेल्या प्रत्येक कष्टाची जाण लेकीला कायम असते. वडीलांसाठी कोणतीही गोष्ट करताना मुलींना खूप आनंद होतो मग वडीलांची काळजी घेणे असो किंवा त्यांच्यासाठी जेवण बनवणे असो. वडीलांना लेकीने केलेल्या प्रत्येक कामाचे कौतुक असते. सध्या अशाच बाप- लेकीच्या सुंदर नात्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
रितू दासगुप्ताने इन्स्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एका कुटुंबातील सुंदर क्षण कैद झाला आहे जो पाहिल्यानंतर सोशल मिडिया वापरकर्ते बोलणे थांबवू शकत नाहीत.
क्लिपची सुरुवात रितू तिच्या वडीलांना उत्सुकतेने विचारते, “बाबा, मी तुमच्यासाठी पहिल्यांदा जेवण बनवले आहे. तुम्हाला ते आवडले का?” त्यांची प्रतिक्रिया मजेशीर आहे.
मी माझ्या आयुष्यात सर्व काही मिळवले आहे. हे अन्न इतके चांगले आहे की देवी अन्नपूर्णा स्वतः स्वर्गातून अवतरल्यासारखे वाटते, ” अशी मजेशीर प्रतिक्रिया ते देतात आणि घरातील सर्वजण खळखळून हसतात.