८ फेब्रुवारी महत्वाच्या घटना
१७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.
१८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
१८९९: रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
१९३१: महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
१९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
१९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
१९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
१९९४: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
२०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
२०१५: नीती आयोगाची पहिली बैठक
२०२२: कोविड-१९ – जगभरात ४० करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
२०२२: ऑलिंपिक – २०२२ हिवाळी ऑलिंपिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
८ फेब्रुवारी जन्म-दिनविशेष
१६७७: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १७५६)
१७००: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १७८२)
१८२८: फ्रेन्च लेखक ज्यूल्स वर्न यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९०५)
१८३४: रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंदेलिएव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)
१८४४: भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.
१८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९६९)
१९०९: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९९८)
१९२५: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)
१९४१: गझलगायक जगजीतसिंग यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)
१९६३: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.
१९०३: मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान – तुक़ू अब्दुल रहमान (मृत्यू : ६ डिसेंबर १९९०)
१८८२: विमान अपघातात निधन झालेले पहिले व्यक्ती – लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रिज (मृत्यू : १७ सप्टेंबर १९०८)
८ फेब्रुवारी मृत्यू-दिनविशेष
१७२५: रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचे निधन. (जन्म: ९ जून १६७२)
१९२७: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८४९)
१९७१: मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८८७)
१९७५: नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिनसन यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)
१९९४: ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊसकर यांचे निधन.
१९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १९०२)
१९९५: भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन.
१९९९: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२६)
२०२३: भारतीय कादंबरीकार -सुबिमल मिश्रा (जन्म: २० जून १९४३)
२०२३: भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट – इग्नेशियस पॉल पिंटो (जन्म: १८ मे १९२५)
२०२३: सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान – इव्हान सिलायेव (जन्म: २१ ऑक्टोबर १९३०)
२०२२: फ्रेंच विषाणूशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार – ल्यूक माँटाग्नियर (जन्म: १८ ऑगस्ट १९३२)
१९८५: जॅग्वोर कारचे सहसंस्थापक – विल्यम लियन्स जॅग्वोर (जन्म: ४ सप्टेंबर १९०१)
१९३६: अमेरिकेचे ३१वे उपाध्यक्ष – चार्ल्स कर्टिस (जन्म: २५ जानेवारी १८६०)