५ फेब्रुवारी महत्वाच्या घटना
१२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
१६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.
१७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.
१९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
१९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१९४५: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.
१९४८: गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
१९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
१९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
२००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
२००४: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
५ फेब्रुवारी जन्म-दिनविशेष
१७८८: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.
१८४०: डनलप रबर चे सहसंस्थापक जॉन बॉईड डनलप यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९२१)
१९०५: स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)
१९१४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)
१९३३: लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म.
१९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.
१९७६: अभिनेता अभिषेक बच्चन यांचा जन्म.
१९४८: महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त – नीला सत्यनारायणन (मृत्यू : १६ जुलै २०२०)
१९२७: अमेरिकन उद्योगपती, रूथच्या ख्रिस स्टीक हाऊसचे संस्थापक – रुथ फर्टेल (मृत्यू : १६ एप्रिल २००२)
१९२४: भारतीय कार्डिनल – दुर्यसामी सायमन लौरडुसामी (मृत्यू : २ जून २०१४)
१९१९: भारतीय राजकारणी – खुर्शिद आलम खान (मृत्यू : २० जुलै २०१३)
१८८९: तुर्की देशाचे ६वे पंतप्रधान आणि राजकारणी – रेसेप पेकर (मृत्यू : १ एप्रिल १९५०)
१८७८: सीट्रोएन कंपनीचे संस्थापक – आंद्रे सीट्रोएन (मृत्यू : ३ जुलै १९३५)
१८४०: मॅक्सिम तोफेचे शोधक – हिराम मॅक्सिम (मृत्यू : २४ नोव्हेंबर १९१६).
५ फेब्रुवारी मृत्यू-दिनविशेष
१९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)
१९२७: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १८८२)
२०००: गायिका कालिंदी केसकर यांचे निधन.
२००३: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन.
२००८: योग गुरू महर्षी महेश योगी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१७)
२०१०: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४)
२०२३: पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष – जनरल परवेझ मुशर्रफ (जन्म: ११ ऑगस्ट १९४३)
२०२३: भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते – टी. पी. गजेंद्रन
२००३: रशियन अभियंते, AN-94 रायफलचे रचनाकार – गेनाडी निकोनोव्ह (जन्म: ११ ऑगस्ट १९५०)
१९८८: इंग्लिश-डॅनिश अभियंता आणि व्यापारी, अरुपचे संस्थापक – ओवे अरुप (जन्म: १६ एप्रिल १८९५)