१ जानेवारी घटना – दिनविशेष
२०२२: रिजनल कॉमप्रेहेंसीव इकनॉमिक पार्टनरशीप – (Regional Comprehensive Economic Partnership) हा ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई,कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या आशिया-पॅसिफिक राष्ट्रांमधील मुक्त व्यापार करार असून, जगातील सर्वात मोठा व्यापार गट तयार झाला.
१९३२: सकाळ वृत्तपत्र डॉ. नारायण परुळेकर यांनी सुरु केले.
१९२३ः स्वराज्य पार्टी – चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापना केली.
१९०८: ललित कलादर्श – संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे नाटक कंपनी स्थापन केली.
१९०० : मित्रमेळा – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापना केली.
१८९९ : क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
१८८३: नूतन मराठी विद्यालय, पुणे – स्थापना.
१८८०: न्यू इंग्लिश स्कूल, पुणे – विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी स्थापना केली.
१८६२: इंडियन पिनल कोड सुरवात.
१८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
१८१८: भीमा कोरेगावची लढाई – बाजी राव पेशवा (दुसरे) आणि दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियन मधल्या लढाईला मराठ्यांचा पराभव.
१८०८ : अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
१ जानेवारी जन्म – दिनविशेष
१९८१: लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी – भारतीय मार्शल आर्टिस्ट (निधन: २१ जुलै २०१३) १९५८ : प्रदीप पटवर्धन – भारतीय अभिनेते (निधन: ९ ऑगस्ट २०२२)
१९५६ः मार्क आर. ह्यूजेस – हर्बालाइफ कंपनीचे स्थापक (निधन: २१ मे २०००)
१९५१ : नाना पाटेकर – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५० : दीपा मेहता – भारतीय कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
१९४३: रघुनाथ माशेलकर – भारतीय शास्त्रज्ञ, वैज्ञानिक – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९४२ : मारिच मानसिंग श्रेष्ठ – नेपाळ देशाचे २८ वे पंतप्रधान, राजकारणी (निधन : १५ ऑगस्ट २०१३)
१९४१ : गोवर्धन असरानी – चित्रपट कलाकार.
१९३६ः राजा राजवाडे – साहित्यिक (निधन: २१ जुलै १९९७)
१९२८ : मधुकर आष्टीकर – लेखक (निधन: २२ मे १९९८)
१९२३ : उमा देवी खत्री – अभिनेत्री व गायिका ( निधन: २४ नोव्हेंबर २००३)
१९१८: कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस – भारतीय-स्कॉटिश सैनिक – व्हिक्टोरिया क्रॉस (निधन: ९ ऑक्टोबर २०००)
१९१८ : शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (निधन: ९ ऑगस्ट २००२)
१९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतीय भूविज्ञान वैज्ञानिक (निधन: ६ डिसेंबर १९७१)
१९००: श्रीकृष्ण रातंजनकर – भारतीय शास्त्रीय गायक – पद्म भूषण (निधन : १४ फेब्रुवारी १९७४)
१८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ – पद्म विभूषण (निधन: ४ फेब्रुवारी १९७४)
१८९२ : महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते (निधन : १५ ऑगस्ट १९४२)
१८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (निधन: ७ जून १९७०)
१८६३ः पियरे डी कौर्तिन – आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्थापक (निधनः २ सप्टेंबर १९३७)
१६६२: बाळाजी विश्वनाथ भट – मराठा साम्राज्याचे ६वे पेशवा (निधन : १२ एप्रिल १७२०)
१ जानेवारी निधन – दिनविशेष.
२००९: रामाश्रेय झा – शास्त्रीय संगीतकार, वादक – संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
१९९६ः ओरापिन चैयाकन – थायलंड देशाच्या संसदेवर निवडून आलेलय पहिल्या महिला (जन्म: ६ मे १९०४)
१९८९: दिनकर साक्रीकर समाजवादी विचारवंत व पत्रकार
१९७५ : शंकरराव किर्लोस्कर – भारतीय उद्योजक, साहित्यिक व चित्रकार (जन्म: ८ ऑक्टोबर १८९१).
१९६६: व्हिन्सेंट ऑरिओल – फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म: २७ ऑगस्ट १८८४) १९५५:
शांतिस्वरूप भटनागर – भारतीय कोलॉइड रसायनशास्त्रज्ञ – पद्म भूषण (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४ )
१९४४ : सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९)
१८९४: हेन्री रिच हर्ट्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
१७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७)
१५१५: लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १४६२)