३१ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष
१६६५: मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.
१८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
१८८९: आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
१९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
१९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
१९६६: रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
१९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
२००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या
३१ मार्च जन्म दिनविशेष
१५०४: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२)
१५१९: फ्रान्सचा राजा हेन्री (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १५५९)
१५९६: फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक रेनें देंकार्त यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)
१८४३: नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)
१८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८७)
१८७१: स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६०)
१९०२: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २०००)
१९३४: भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००९)
१९३८: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा जन्म.
१९७२: ट्विटर चे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांचा जन्म.
१९७८: भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म.
१९८७: भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म
१९५८: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर उमा पेम्माराजू यांचा जन्म (मृत्यू : ८ ऑगस्ट २०२२)
१९३९: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया याचा जन्म (मृत्यू : ३१ डिसेंबर १९९३)
१९२६: भारतीय धर्मगुरू सुधींद्र तीर्थ याचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी २०१६)
१९१३: व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचा जन्म (मृत्यू : २३ मार्च १९९१)
१८७२: रशियन समीक्षक आणि निर्माते, बॅलेट्स रसेसचे संस्थापक सर्गेई डायघिलेव्ह यांचा जन्म (मृत्यू : १९ ऑगस्ट १९२९)
१८७१: डेल इरेन देशाचे ३रे अध्यक्ष, आयरिश पत्रकार आणि राजकारणी आर्थर ग्रिफिथ यांचा जन्म (मृत्यू : १२ ऑगस्ट १९२२)
३१ मार्च मृत्यू दिनविशेष
१९१३: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८३७)
१९७२: अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९३२)
१९७८: इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचे निधन.(जन्म: २७ फेब्रुवारी १८९९)
२०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९०२)
२००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२४)
२००४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)
२००४: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)