संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यापासून राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी विरोधकांनी मागणी लावून धरली आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे, तसंच या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप ज्याच्यावर होतो आहे त्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. धनंजय मुंडे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का? हे विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.