१८ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष

१८ फेब्रुवारी महत्वाच्या घटना-दिनविशेष-mycivilexam.com

१८ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१९६५: गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.

१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.


१८ फेब्रुवारी जन्म-दिनविशेष

१४८६: योगी चैतन्य महाप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १५३४)

१७४५: बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च १८२७)

१८२३: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२)

१८३६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

१८७१: थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९३३)

१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९)

१८९८: फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८)

१९११: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०००)

१९१४: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७६)

१९२६: अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)

१९२७: संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ खय्याम यांचा जन्म.

१९३३: अभिनेत्री नवाब बानू ऊर्फ निम्मी यांचा जन्म.

२५९: चीनचे पहिले सम्राट – किन शी हुआंग (मृत्यू : १० सप्टेंबर इ.स.पू. २१०)

१९३१: अमेरिकन लेखक, – नोबेल, पुलित्झर पुरस्कार – टोनी मॉरिसन (मृत्यु: ५ ऑगस्ट २०१९)

१९२२: ग्रेनेडा देशाचे १ले पंतप्रधान, ग्रेनेडियन शिक्षक आणि राजकारणी – एरिक गेयरी (मृत्यू : २३ ऑगस्ट १९९७)


१८ फेब्रुवारी मृत्यू-दिनविशेष

१२९४: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १२१५)

१४०५: मंगोल सरदार तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १३३६)

१५६४: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १४७५)

१९६७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९०४)

१९९२: चित्रकार नारायण श्रीधर बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१०)

१९९४: कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. पंडित गोपीकृष्ण यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९३५)

२०२३: भारतीय अभिनेते – तारका रत्न (जन्म: २२ फेब्रुवारी १९८३)

२०१५: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते – डी. रामनाडू (जन्म: ६ जून १९३६)

१९६४: जोसेफ-आर्मंड बॉम्बार्डियर – कॅनेडियन उद्योगपती, Bombardier Inc चे संस्थापक (जन्म: १६ एप्रिल १९०७)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.