१६ जानेवारी महत्वाच्या घटना.
१६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
१६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.
१६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
१९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.
१९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.
१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण.
१९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
१९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.
१९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
१९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.
१९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.
१९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.
१६ जानेवारी जन्म-दिनविशेष.
१८५३: मिचेलीन टायर्स कंपनी चे संस्थापक फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)
१९२०: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)
१९२६: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी २००७)
१९४६: चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म.
९७२: शेंग झोन्ग – लियाओ राजवंशाचे सम्राट (मृत्यू : २५ जून १०३१)
२००४: भारतीय रायफल नेमबाज – सुवर्ण पदक – रमिता
१९८५: भारतीय अभिनेते सिद्धार्थ मल्होत्रा यांचा जन्म
१९५८: लॅटव्हिया देशाचे ४थे पंतप्रधान अँड्रिस स्केले यांचा जन्म
१९५३: रॉबर्ट जे मॅथ्यूज – अमेरिकन निओ-नाझी कार्यकर्ते आणि द ऑर्डर संघटनेचे नेते (मृत्यू : ८ डिसेंबर १९८४)
१९५२: इजिप्त देशाचे राजा फुआद (दुसरे) याचा जन्म
१९४९: ऍनी एफ. बेइलर – आंटी अॅनचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती
१९३१: सुभाष मुखर्जी – इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ (मृत्यू : १९ जून १९८१)
१९३१: जोहान्स राऊ – जर्मनी देशाचे ८वे फेडरल अध्यक्ष (मृत्यू : २७ जानेवारी २००६)
१९२९: स्टॅन्ली जयराजा तांभिया – श्रीलंकन मानववंशशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (मृत्यू : १९ जानेवारी २०१४)
१९१७: कार्ल कार्चर – कार्ल्स ज्युनियरचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (मृत्यू : ११ जानेवारी २००८
१९११: एडुआर्डो फ्री मॉन्टाल्वा – चिली देशाचे २८वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू : २२ जानेवारी १९८२)
१९०१: फुलजेन्सियो बॅटिस्टा – क्युबा देशाचे ९वे राष्ट्राध्यक्ष, क्यूबन कर्नल आणि राजकारणी (मृत्यू : ६ ऑगस्ट १९७३)
१८४४: इस्माईल केमाली – अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू : २६ जानेवारी १९१९)
१६३०: गुरु हर राय – ७वे शीख गुरु (मृयू : ६ ऑक्टोबर १६६१)
१५१६: बेयिनौंग – बर्माचे राजा (मृत्यू : १० ऑक्टोबर १५८१)
१४०९: अंजू च्या रेने – नेपल्स देशाचे राजा (मृत्यू : १० जुलै १४८०)
१०९३: आयझॅक कॉम्नेनोस – बायझँटाईन सम्राट अलेक्सिओस (पहिला) कोम्नेनोस यांचा मुलगा.
१६ जानेवारी मृत्यू-दिनविशेष.
१९०९: समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८४२)
१९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
१९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)
१९६६: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)
१६६७: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०१)
१९८८: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)
१९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या.
२०००: मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत त्रिलोकीनाथ कौल यांचे निधन.
२००३: सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक रामविलास जगन्नाथ राठी यांचे निधन.
२००५: संगीतकार, पेटीवाले मेहेंदळे उर्फ श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन.
२०१३: आंद्रे कॅसॅग्नेस – फ्रेंच तंत्रज्ञ आणि खेळणी निर्माते (जन्म: २३ सप्टेंबर १९२६)
२०१३: ग्लेन पी. रॉबिन्सन – सायंटिफिक अटलांटा कंपनीचे सह-संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: १० सप्टेंबर १९२३)
२०१०: ग्लेन बेल – टॅको बेलचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)
१९७८: ए.व्ही. कुलसिंघम – श्रीलंकन पत्रकार, वकील आणि राजकारणी (जन्म: ११ ऑक्टोबर १८९०)
१९७२: रॉस बागडासरियन, सीनियर. – अल्विन आणि चिपमंक्स चे निर्माते, अमेरिकन गायक-गीतकार (जन्म: २७ जानेवारी १९१९)
१९६८: बॉब जोन्स सीनियर – बॉब जोन्स विद्यापीठाचे संस्थापक, अमेरिकन प्रचारक (जन्म: ३० ऑक्टोबर १८८३)
१९४२: प्रिन्स आर्थर – ड्यूक ऑफ कॅनॉट आणि स्ट्रेथर्न (जन्म: १ मे १८५०)
१९३८: सरतचंद्र चट्टोपाध्याय – भारतीय लेखक आणि नाटककार (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
१९०६: मार्शल फील्ड – मार्शल फील्ड अँड कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: १८ ऑगस्ट १८३४)
१७११: जोसेफ वाझ – भारतीय-श्रीलंकन धर्मगुरू आणि संत (जन्म: २१ एप्रिल १६५१)
१७१०: हिगाशियामा – जपानी सम्राट (जन्म: २१ ऑक्टोबर १६७५)
१५९५: मुराद (तिसरा) – ऑट्टोमन सुलतान (जन्म: ४ जुलै १५४६)