१४ फेब्रुवारी महत्वाच्या घटना
१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.
१८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.
१८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
१९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.
१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.
१९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४६: पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
१९८९: भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.
१९८९: ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.
२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
२००३: नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्या सरस्वती सन्मानासाठी निवड.
२००३: नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्या सरस्वती सन्मानासाठी निवड.
२०२२: कॅनडा – कोविड-१९ महामारीच्या आदेश आणि निर्बंधांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करत असलेल्या लोकाना रोकण्यासाठी, पंतप्रधान जस्टीन ट्रूदेऊ यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आपत्कालीन कायदा लागू केला.
१४ फेब्रुवारी जन्म-दिनविशेष
१४८३: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १५३०)
१९१४: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६)
१९१६: कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०००)
१९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर २०१३)
१९३३: अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ – मुंबई)
१९५०: वकील आणि केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचा जन्म.
१९५२: दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या – पद्म विभूषण – सुषमा स्वराज (मृत्यू : ६ ऑगस्ट २०१९)
१८८५: भारतीय तत्त्वज्ञ – सैयद जफरुल हसन (मृत्यू : १९ जून १९४९)
१४ फेब्रुवारी मृत्यू-दिनविशेष
१४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १३३६)
१९७४: आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९००)
१९९५: इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८८१)
१९७५: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचे निधन. (जन्म: २२ जून १८८७)
२०२३: भारतीय अभिनेते – जावेद खान अमरोही
२०२३: भारतीय न्यायशास्त्रज्ञ, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – कुदारीकोटी अन्नदानय्या स्वामी
२०२३: टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष – शोइचिरो टोयोडा (जन्म: २७ फेब्रुवारी १९२५)
१९७५: इंग्लिश लेखक – पी. जी. वूडहाऊस (जन्म: १५ ऑक्टोबर १८८१)
१८३१: मेक्सिकन बंडखोर नेते आणि मेक्सिकोचे अध्यक्ष – व्हिसेंट ग्युरेरो (जन्म: १० ऑगस्ट १७८२)
१७४४: इंग्रजी गणितज्ञ, परावर्तित ऑक्टनचे संशोधक – जॉन हॅडली (जन्म: १६ एप्रिल १६८२)