१ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

१ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष-mycivilexam.com
१ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

१ मार्च महत्वाच्या घटना दिनविशेष

१५६५: रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.

१८०३: ओहायो हे अमेरिकेचे १७वे राज्य बनले.

१८७२: यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.

१८७३: ई. रेमिंगटोन आणि सन्स कंपनी ने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर) चे उत्पादन सुरू होते.

१८९३: अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.

१८९६: हेन्री बॅक्वरल अणुकिरणोत्सर्जीचे किडणे शोधले.

१९०१: ऑस्ट्रेलियन लष्कर स्थापन करण्यात आले.

१९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.

१९२७: रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.

१९३६: अमेरिकेतील महाकाय हूव्हर धरण बांधून पूर्ण झाले.

१९४६: बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयीकरण झाले.

१९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.

१९४८: गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९५४: प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.

१९६१: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कॉर्पस स्थापन करते.

१९६१: युगांडा मध्ये लोकशाही गणतंत्र सुरु होऊन पहिल्या निवडणुकी झाल्या.

१९९२: बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.

१९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.

१९९८: दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

२००२: पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.


१ मार्च जन्म दिनविशेष

१९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म.

१९२२: नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान यित्झॅक राबिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५)

१९३०: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल २०१३)

१९४४: पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.

१९६८: क्रिकेटपटू सलील अंकोला यांचा जन्म.

१९८०: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी यांचा जन्म.

१८६८: ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस – सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग (मृत्यू : २८ जून १९१४)

१६८३: सांग्यांग ग्यात्सो – ६वे दलाई लामा (मृत्यू : १५ नोव्हेंबर १७०६)


१ मार्च मृत्यू दिनविशेष

१९५५: महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८७७)

१९८९: महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील याचं निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

१९९१: पोलाराईड कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक एडविन एच लँड यांचे निधन. (जन्म: ७ मे १९०९)

१९९४: निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७)

१९९९: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर याचं निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९१०)

२००३: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १९४२)

२०१६: AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३९)

१९१४: भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल – गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड (जन्म: ९ जून १८४५)


नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.