➤ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक संस्था असून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात शासनाला लागणारी अधिकारी कर्मचारी पदे भरण्यासाठी यंत्रणा राबवते.
▶ भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 315 मध्ये असा उल्लेख आहे कि प्रत्येक राज्य त्या राज्यातील कर्मचारी निवडी साठी अश्या प्रकारचा आयोग स्थापन करू शकते. व कलम 320 मध्ये आयोगाचे कार्य नमूद करण्यात आले आहेत.
▶ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC)मार्फत दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाते.
▶महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग(MPSC) मुख्यत्वे वर्ग-1 आणि वर्ग-2 साठी परीक्षा घेते तर काही प्रमाणात वर्ग – ३ साठी सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जात असते.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग(MPSC)कोणकोणत्या परीक्षा घेते?
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) संस्था मुख्यता महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा नामक परीक्षा घेत असते, त्याचबरोबर खालील प्रकारच्या परीक्षा आयोजित केल्या जातात.
१)महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा
२)दुय्यम सेवा परीक्षा
३)तंत्रज्ञान सेवा परीक्षा
४)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
५)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा परीक्षा मार्फत भरली जाणारी पदे
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग(MPSC)वर्ग अ मधील पोस्ट खलील प्रमाणे,
१)Deputy Collector (उपजिल्हाधिकारी )
२)Deputy Superintendent of Police (पोलीस उपअधीक्षक)
३)Deputy Registrar Cooperative Societies
४)Tahsildar (तहसीलदार)
५)Block Development Officer (BDO)- (गट विकास अधिकारी)
६)Superintendent State Excise Department (अधीक्षक)
७)Assistant Commissioner of State Tax (राज्यकर सहायक आयुक्त)
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग(MPSC)वर्ग ब मधील पोस्ट खलील प्रमाणे,
१) Naib Tahsildar (नायब तहसीलदार)
२) Assistant Regional Transport Officer (ARTO)
३) Deputy Registrar Cooperative Societies
४) Sub-registrar Cooperative Societies
५) F.A.S (Maharashtra Finance, Audit & Account Service)- Group B
६)Taluka Inspector of Land Records (TILR)-(भूमिलेखा निरीक्षक)
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग Combine (दुय्यम सेवा) परीक्षा मधून भरली जाणारी पदे खलील प्रमाणे,
१) STI(State Tax Inspector)-राज्य कर निरीक्षक
२) Police Sub Inspector-(PSI)-पोलीस उपनिरीक्षक
३) Assistant Section Officer-(ASO)-कक्ष अधिकारी
४) Sub Registrar -दुय्यम निबंधक
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग Combine परीक्षा मधून भरली जाणारी वर्ग क ची पदे खलील प्रमाणे,
१) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क-(ESI)
२) तांत्रिक सहाय्यक
३) कर सहायक
४) लिपिक